श्रीलक्ष्मीपल्लीनाथाचा इतिहास
मौ जे पाली, ता. रत्नागिरी येथे असलेले लक्ष्मीपल्लीनाथाचे देवस्थान हेच आठल्ये घराण्याचे कुलदैवत होय. पाली या गावाचे पूर्वीचे नाव करंबेळे असे असून त्यावेळच्या ग्रामदैवतांच्या मूर्ती अरण्यात एकत्र ठेविलेल्या होत्या. अलीकडेच त्यांचे तेथे एक लहानसे देवालय बांधून त्यात त्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यास 'करंबेळदेव' असे म्हणतात. पल्लीनाथाच्या स्थापनेमुळे या गावाचे नाव पाली व देवाचे नाव पल्लीनाथ असे रूढ झाले आहे.
अधिक वाचाकुलोपासकांनी साकारले कुलस्वामीचे मंदिर
श्री लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाची स्थापना झाल्यानंतर मंडळ अस्तित्वात आले. सुधाकर चांदोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाली. मंदिराच्या न्यासाची १७ऑक्टोबर २०१२ रोजी रीतसर नोंदणी झाली. मठ (ता. लांजा) येथे शशिभाऊ गुण्ये यांनी २ एकर जागा नाममात्र मोबदल्यात मंदिरासाठी उपलब्ध करून दिली. नवी जागा हाती आल्यानंतर तेथे २ जानेवारी २०१३ रोजी भूमिपूजन झाले. भूचक्र यज्ञ करण्यात आला. मंदिर उभारण्याच्या दृष्टीने एकत्रीकरण झाले, त्यात तरुणांचा सहभाग मोठा होता. सर्व कुलोपासकांनी देणग्या दिल्या. त्यानंतर दर महिन्याला ठरावीक देणगी देणारे अनेक कुलोपासक आहेत. त्यांच्या अर्थसाह्यातून नियोजित प्रकल्प २०१८ साली पूर्ण झाला आहे.
अधिक वाचा